Saturday, August 04, 2007

खुर्चि


एकदा एका चौकात ठेवली होती खुर्चि
प्रत्येकाला खुणावत होती ती जागा वरची

तिला बघुन बंड्याला जागिच घाम फ़ुटला
त्यात बसणाऱ्या सरांचा त्याला एकदम भास झाला.

तिला बघुन चिंटुला एकदम मज्जा वाटली..
चाकांसकटच्या खुर्चिची केलेली गाडी त्याला आठवली

खुर्चिला बघताच माने जागेवरच थबकले.
साहेबाच्या आठवणीचे एकदमच गारठले..

त्याच खुर्चिला पाहुन रोझीची कळी खुलली
कालच कोणी नसताना साहेबाने तिला आपल्या खुर्चितच बसवली

तीच खुर्ची पाहुन मुन्नाभाई गांगरला..
ठाण्यात असल्यासारखा एक कडक सलाम ठोकला.

गाडीतुन जाता जाता, राणेंनी विचार केला साधा
विधानसभेपेक्षा हीचा लोकसभेत फ़ायदा

तिला पाहुन सुमी एकदम रडु लागली
त्या खुर्चीतली आजोबांची मुर्ति तिच्या डोळ्यासमोर आली

राधा खुर्चि पहाताच फ़ारच बुवा लाजली
थेटरातिल कोपऱ्यातिल खुर्ची तिच्या डोळ्यातुन लकाकली

तिला पाहुन जोशी एकदम सुखावले
पोटावर केसरी ठेवुन काढलेल्या डुलक्यांचे भास त्यांना झाले

अश्या ह्या खुर्चिने चौकात एकदम कमी जागा व्यापली आहे
चौकापेक्षा जास्त चारचौघांच्या मनातच ती वसली आहे

-ऋषि

0 Comments:

Post a Comment

<< Home