आपण यांना पाहिलय का?
अजुनही आठवतय,
आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं..
तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं...
जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण...
माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का?
रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलय का??
चिंब पावसात भिजुन.. मग भुट्टा खाणं...
चौपाटीवरचा गोळा भुर्ऱर्ऱर्ऱ करुन चोखण...
केवळ पैजेखातर पेप्सि बॉटल एका दमात रिचवणं...
नंतर न थांबणाऱ्या ढेकरा आता कायमच्या थांबल्यात का?
क्षणिक सुखाच्या मागे धावताना खरा आनंद हरवला आहे.. आपण यांना पाहिलय का??
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण...
खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं...
एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं....
ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का?
मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलय का??
केसांतुन लाडाने फ़िरणाऱ्या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलय का??डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलय का??
कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगऱ्याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलय का??
हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलय का?
आता काय काय सांगु...
ह्या जनसागरातही एकटा असणारा मी...
माझा मलाच शोधतो आहे.. माझा मीच हरवलो आहे...
आपण खऱ्या मला पहिलय का??

3 Comments:
man.... it just keeps gettin better n better... khupach sundar ahe... hya dagdagit asa vichar yetoch... ki aadhi jevdha sukhi hoto ani ajun sukh milavnyachya naadat te hi sukh gamavle... is it worth it? :) very true words :) keep goin... :)
Khupach chan ahe...
मला खुप आवडली तुझी कविता
मस्त आहे.
Post a Comment
<< Home